आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:राज्यस्तरीय युवा महोत्सवात‎ लातूर विभागाने मारली बाजी‎

नंदुरबार‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
छाया नितीन पाटील, नंदुरबार‎ - Divya Marathi
छाया नितीन पाटील, नंदुरबार‎

येथे झालेल्या राज्यस्तरीय युवा‎ महोत्सवात गोंधळ लोकगीत आणि‎ दिंडी लोकनृत्यात लातूर विभागाने‎ प्रथम क्रमांक मिळवला. ते हुबळी‎ (कर्नाटक) येथे १२ ते १७ जानेवारी‎ होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात‎ महाराष्ट्राचे नेतृत्व करतील.‎ युवा महोत्सवात महाराष्ट्रातून‎ नागपूर, अमरावती, लातूर,‎ नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर,‎ औरंगाबाद अशा ८ विभागातून‎ लोकनृत्य व लोकगीत या कला‎ प्रकाराकरिता एकूण २५०‎ कलाकारांनी सहभाग घेतला.

या‎ युवा महोत्सवाचे उद्घाटन‎ उपविभागीय पोलिस अधीक्षक,‎ नंदुरबार सचिन हिरे, तहसीलदार‎ भाऊसाहेब थोरात, शहर पोलिस‎ निरीक्षक, रवींद्र कळमकर , नेहरू‎ युवा केंद्राचे समन्वयक, अर्श‎ कौशिक, क्रीडा संघटक प्रा. डॉ.‎ ईश्वर धामणे, श्रॉफ हायस्कूल चे‎ मुख्याध्यापिका सुषमा शाह,‎ यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक,‎ शिवाजी पाटील, डी. आर.‎ हायस्कूलचे मुख्याध्यापक,‎ नारायण भदाणे, डॉ. काणे गर्ल्सचे‎ मुख्याध्यापिका, सीमा मोडक, एस.‎ ए. मिशनच्या मुख्याध्यापिका‎ नूतनवर्षा वळवी, अरविंद चौधरी,‎ उपस्थित होते. जिल्हा क्रीडा‎ अधिकारी, नंदुरबार सुनंदा पाटील‎ यांनी आपले प्रास्ताविक केले.‎

असा आहे स्पर्धेचा निकाल‎ राज्य युवा महोत्सवात लोकगीत या‎ प्रकारत लातूर विभागाने गोंधळ‎ गीत सादर करत प्रथम क्रमांक‎ मिळवला तसेच मुंबई विभागाचे‎ कोळीगीत सादर करत द्वितीय‎ क्रमांक तर नागपूर विभागाने‎ छत्तीसगडी कर्मा गीत सादर करीत‎ तृतीय क्रमांक मिळवला.‎ लोकनृत्यात लातूर विभागाने दिंडी‎ नृत्य सादर करत प्रथम तर मुंबई‎ विभागाने दिंडी नृत्य सादर करत‎ द्वितीय तर नाशिक विभागाने ढोल‎ नृत्य सादर करून तृतीय क्रमांक‎ मिळवला. यश मि‌‌ळवलेल्या‎ संघाचे कौतुक करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...