आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सढळ हाताने मदत:सैनिकांच्या कल्याण निधीसाठी सढळ हाताने मदत करा; जिल्हाधिकारी

नंदुरबार15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालय प्रमुखांनी सैनिक कल्याण निधीस सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कार्यालयाच्या अध्यक्ष मनीषा खत्री यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान मोलाचे आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सैनिक भूदल, नौदल आणि हवाई दलात कार्यरत असून वेळप्रसंगी प्राणाची आहुती देतात. माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. त्यासाठी ७ डिसेंबर हा दिवस ध्वज दिन म्हणून पाळण्यात येतो. तेव्हापासून ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ध्वज निधी देशभर संकलित केला जातो. युद्धात अपंगत्व प्राप्त आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध योजनांसाठी या निधीचा उपयोग केला जातो.

या पार्श्वभूमीवर अधिकारी वर्ग व तत्सम पदाधिकारी प्रत्येकी १२०० रुपये, अधिकारी वर्ग दोन व तत्सम पदाधिकारी प्रत्येकी १ हजार रुपये, कर्मचारी वर्ग तीन व तत्सम पदाधिकारी प्रत्येकी ८०० रुपये, तर कर्मचारी चारकडून प्रत्येकी ५०० रुपये देण्याचे आवाहन केले आहे.

अक्कलकुवा पंचायत समितीतर्फे ७० हजारांची मदत
अक्कलकुवा पं.स.तर्फे सैनिक कल्याण निधीस ७० हजार ६०० रुपयांची मदत देण्यात आली. डेप्युटी सीइओ (नरेगा) नंदकिशोर सूर्यवंशी यांच्या वतीने कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंकज पाटील यांनी ध्वज निधी संकलनाचा धनादेश अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी तेथील बीडीआे महेश पोतदार, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक सुभेदार मेजर रामदास पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...