आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त शोधमोहीम:नंदुरबार जिल्ह्यात मंगळवारपासून कुष्ठरोग ; क्षयरोग रुग्ण शोधमोहीम

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधण्यासाठी मंगळवार, १३ ते ३०सप्टेंबर या कालावधीत आरोग्य विभागाच्या वतीने संयुक्त शोधमोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करून ही मोहीम यशस्वीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्हा समन्वय समितीची बैठकीत दिल्या. अभियान कालावधीत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील ३ लाख ५४ हजार ५०५ घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी १हजार ३६२ तपासणी पथक व २७२ पथक पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे.

कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधमोहिमेनिमित्त जिल्हा समन्वय समितीची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या वेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार, डॉ. राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.

क्षयरोगाची लक्षणे
क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून तो कोणालाही होऊ शकतो. क्षयरोग मुख्यत्वे फुप्फुसांवर परिणाम करतो. दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला, दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट, भूक मंदावणे, मानेवर गाठी येणे, थुंकीत रक्त जाणे अशी लक्षणे आहेत.

कुष्ठरोगाची लक्षणे
अंगावरील फिकट लालसर संवेदनारहित चट्टा, मऊ व चकाकणारी तेलकट त्वचा, अंगावर गाठी व कानाच्या पळ्या जाड होणे, हाता पायांमध्ये बधिरता व शारीरिक विकृती, त्वचेवर थंड व गरम संवेदना न समजणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे अशी लक्षणे आहेत.

बातम्या आणखी आहेत...