आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यानाचे आयोजन:युवकांना छत्रपती शिवरायांचे कार्य अवगत करून द्या ; देवरे

तळोदा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या तरुणांना मोबाइलपासून दूर ठेवा. तरुणांना मोबाइलचे व्यसन जडले आहे. याचे दुष्परिणाम येत्या काळात भयावह असतील म्हणून युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अवगत करून द्या, असे आवाहन व्याख्याते सचिन देवरे यांनी केले. तळोदा येथील सेवाभावे प्रतिष्ठान व कृपासिंधू सेवाभावी संस्था व कलाल समाज नवयुवक गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराय व आजची तरुणाई यावर गणेशाेत्सवादरम्यान व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.

प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजप प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, कलाल समाज अध्यक्ष संजय कलाल, उपाध्यक्ष महेंद्र कलाल, प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. संजय शर्मा, गणेश मंडळाचे अध्यक्ष आनंद कानडे, नगरसेवक गौरव वाणी आदी उपस्थित होते. संजय शर्मा म्हणाले की, आजच्या युवकांवर आई, वडिलांनी असे संस्कार केले पाहिजेत की युवकांच्या हातून सकारात्मक व विधायक कार्य होतील. जीवनामध्ये चढ-उतार हा जीवनाचा अविभाज्य भाग असून, यांना युवा पिढीने सकारात्मकतेने घेऊन जीवनाच्या दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे, असे सांगितले. सूत्रसंचालन अमित कलाल यांनी केले तर आभार उमेश सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाला कलाल समाज पंचचे कोषाध्यक्ष दिलीप गिरनार, जयवंत कलाल, मनोज खैरनार, विलास कलाल, प्रकाश कलाल, चेतन इंगळे, वासुदेव कलाल, विनायक कलाल उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...