आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षणाचा ध्यास आणि पुढे शिकण्याची तळमळ असलेले विद्यार्थी उन्हातान्हात, तासनतास चालून शाळेत येतात आणि आपली प्रगती करतात. शिक्षणाची ही ओढ लक्षात घेऊन लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारने नोव्हेंबर महिन्यात शाळेचे नूतनीकरण केले. नूतनीकरणामुळे लांबच्या पाडे, वस्त्यांहून येते विद्यार्थी येऊ लागले आहेत. अनेक विद्यार्थी साधारण ९ ते १० किलोमीटर चालत येतात-जातात. त्यामुळे लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारने सायकल देण्याचे ठरवले आणि आर्थिक मदतीसाठी जनतेला आवाहन केले. काही दिवसातच दानशूर व्यक्तींच्या साहाय्याने ४६ सायकली येथील विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी लायन्स क्लब आॅफ नाशिक स्टारकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यापैकी ४६ सायकल्स, २ टाॅयलेट बाॅक्स आणि काॅम्प्युटर लॅबसाठी ५ काॅम्प्युटर या शाळेला प्रांतपाल लायन राजेश काेठावदे यांच्या हस्ते देण्यात आले. यासाठी सम्यक शहा यांचे सहकार्य लाभले. क्लबचे अध्यक्ष लायन अभय पाटील यांनी शाळेची सर्वतोपरी देखभाल करण्याची विनंती विद्यार्थ्यांना केली. क्लबचे परमनंट प्रोजेक्ट हेड लायन राम डावरे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकास तसेच इयत्ता दहावीसाठी जास्तीत जास्त गुणवत्तेने उत्तीर्ण होण्याचे आवाहन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री सारुक्ते सर, ढोबळे सर व शाळेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्याच दिवशी सायंकाळी हॉटेल 7 ॲपल येथे सर्व साधारण सभा आयोजित करण्यात आली. डिस्ट्रिक्ट 3234D2 चे प्रांतपाल लायन राजेश कोठावदे या वेळेस उपस्थित होते. यावेळी श्रीया कुलकर्णी यांनी गणेशवंदना सादर केली. लायन मीरा मराठे यांनी ध्वजवंदन केले. अध्यक्ष लायन अभय पाटील यांनी आपल्या कारकीर्दीचा अहवाल सादर केला. प्रांतपाल लायन राजेश कोठावदे यांनी मनोगतात क्लबची कारकीर्द आणि सदस्यांचा सहभाग याबद्दल समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी काही सदस्य आणि संचालकांचा गौरव ही केला. आभार प्रदर्शन ला. अर्चना सिंग यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.