आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानंदुरबार जिल्ह्यात लंपी स्किन डिसीज रोगांच्या प्रादुर्भाव आढळून आल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ने-आण करण्यास व खरेदी- विक्री व प्राण्याचे बाजार भरवण्यास मनाई करण्यात आली होती. लंपी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय व तालुकानिहाय आढावा बैठकीत जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा तालुक्यातील प्राणी बाजार भरवणे व जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतूक करण्यास पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरु करीत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री नी दिले आहे.
जिल्ह्यातंर्गत गुरांची वाहतूक करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गुरांचे लंपी चर्मरोगाकरिता २८ दिवसापूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असावे. वाहतूक करावयाच्या गुरांची ओळख पटवण्यासाठी गोजातीय प्रजातींच्या कानात टॅग नंबर असणे तसेच इनाफ पोर्टलवर नोंदणी असणे बंधनकारक राहील. संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून गुरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ते आरोग्य प्रमाणपत्र बंधनकारक असून ते देण्यासाठी राज्य शासनाच्या, जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी गट -अ पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे.
गुरांची वाहतूक करतांना आरोग्य दाखला तसेच जनावरांची वाहतूक अधिनियम २००१ मधील नियम ४७ अन्वये स्वास्थ्य प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, प्रक्षेत्रे व पशुबाजारामध्ये यापुढे टॅगिंग व रोग प्रतिबंधक लसीकरणाची खात्री झाल्याशिवाय गुरांची खरेदी विक्री करुन नयेत. सदर आदेशाचे अंमलबजावणीसाठी पशुसंवर्धन विभाग, पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.