आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जीवन जगताना विज्ञान, अध्यात्माचे मिश्रण हवे; जिल्हा उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांचे प्रतिपादन

शहादा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजचे युग हे विज्ञानाचे आहे. यात वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार जीवनशैली बदलतो तोच तरू शकतो. ज्ञानाचे भरपूर मार्ग आहेत; परंतु आपण किती ग्रहण करतो यावर ते अवलंबून आहे. जीवन जगताना विज्ञान आणि अध्यात्म यांचे मिश्रण पाहिजे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन उप शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी केले.

येथील शेठ व्ही.के. शहा विद्यालयात नीती आयोगाचा अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गत अटल टिकरिंग प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी रोकडे बोलत होते. तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मोतीलाल पाटील अध्यक्षस्थानी होते. तर संस्थेचे उपाध्यक्ष हिरालाल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजीत पाटील, उपशिक्षणाधिकारी बी.आर. रोकडे, पालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, गटशिक्षणाधिकारी डी. टी. वळवी, संचालक विठ्ठल पाटील, माजी प्राचार्य एल. एन. चौधरी, प्राचार्य एस. पी. पाटील, उपप्राचार्य एस. जे. पटेल, उपमुख्याध्यापक एस. डी. भोई, पर्यवेक्षक हिरजी पाटील, व्ही. आर. पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य एस. पी. पाटील यांनी केले.

विद्यार्थ्यांनी उंच भरारी घ्यावी
संस्थेचे अध्यक्ष मोतीलाल पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात आपल्या मनातील वेगवेगळ्या क्लुप्त्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून मांडाव्यात. वेगवेगळे प्रयोग करावेत विज्ञानात गोडी निर्माण व्हावी यासाठी या प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. वेगवेगळे प्रयोग करूनच मनुष्य आयुष्यात उंच भरारी घेतो. संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहे आहे, हा संस्थेतल्या प्रगतीचा इतिहास आहे. त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांनी ज्ञानग्रहण करून उंच भरारी घ्यावी, असे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...