आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय व कृषी महाविद्यालय लोणखेडा येथील राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह साजरा करण्यात आला.
महाविद्यालय परिसर, वैद्यकीय दवाखाना, पांडव/जैन लेणी, गोमाई नदीपात्र, लोणखेडा चार रस्ता परिसर आदी ठिकाणी स्वच्छता अभियान सोबतच पाणी अडवा-पाणी जिरवा, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व संवर्धन आदी विषयांवर पथनाट्य सादरीकरण करून जनजागृती उपक्रम राबवण्यात आले. ३०० सीड बॉल्सचे वाटप करण्यात आले. सप्ताहाचा समारोप माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाविषयी शपथ घेऊन आणि प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाने करण्यात आला. समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील, प्राचार्य डॉ. पी.एल.पटेल, प्रा.डॉ. आर. एम. चौधरी, प्रा. डॉ. पी.पी. जगताप प्रा. ए.बी. पाटील, प्रा.आर.व्ही.पाटील, प्रा. पी.जी. चांडिले, प्रा. मोहन चितोड आदी उपस्थित होते. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांनी कौतुक केले. सप्ताहाच्या उपक्रमांचे नियोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.पंकज पेंढारकर, प्रा.राजेंद्र पाटील, प्रा.डॉ. वजीह अशहर, प्रा. डॉ. वर्षा चौधरी यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.