आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबादहून अहमदाबादकडे जाणाऱ्या लक्झरी बसला अचानक भीषण आग लागली. सोमवार पहाटे सकाळी ३:३० वाजेच्या सुमारास धुळे-सुरत महामार्गावरील विसरवाडी पासून ८ किलोमीटर अंतरावर सोनखांब गावाजवळील शिवार शेरेटन हॉटेल लगत लक्झरी बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले.
एमके ट्रॅव्हल्सची बस (क्रमांक एम एच ४० ए टी २९२९) ही औरंगाबादहून अहमदाबाद कडे जात होती. बस पहाटे नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाट उतरून सोनखांब शिवारातून जात असता लक्झरी बसच्या लायनरच्या घर्षणामुळे चाकाने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे समजताच चालकाने तत्काळ रस्त्याच्या कडेला बस घेऊन बसमधील प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या.
सुदैवाने जीवितहानी टळली मात्र आगीचे स्वरुप अतिशय तिव्र असल्याने काही क्षणात बसने पेट घेतला. या दरम्यान काही प्रवास्यांचे साहित्य गाडीत अडकल्यामुळे जळून खाक झाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.