आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानंदुरबार जिल्ह्यातील सातपुडातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातल्या चांदसेली घाटात दरड कोसळल्याने एका महिलेला उपचारासाठी नेता आला नाही आणि तिचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे सिदलीबाई पाडवी या महिलेला उपचारासाठी खांद्यावरून घेऊन जाण्याची वेळ आली. मात्र सिदलीबाईनी खांद्यांवर अखेरचा श्वास घेत घाटातच जीव सोडला.
या घटनेमुळे पुन्हा सातपुड्यातील आदिवासींचे दुर्दैव आणि दुःख समोर आले आहे. विशेष म्हणजे याच भागाचे प्रतिनिधित्व राज्याचे आदिवासी विकास मंत्री अॅड. केसी पाडवी करतात. हा चांदसेली घाट दरवर्षी दरड कोसळल्यामुळे बंद पडतो आणि हजारो आदिवासी बांधवांचा जगणे वेठीस धरतो. असे असताना हा घाट कायमस्वरूपी दुरुस्त करावा असे कुणाला वाटत नाही. तात्पुरती डागडुजी करून रस्ता सुरू केला जातो आणि दुर्घटनांना आमंत्रण दिले जाते. काही दिवसांपूर्वी तोरणमाळ जवळ अशाच पद्धतीने रस्ते खराब असल्यामुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. सातपूर सातपुडा डोंगर रांगा मधील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आणि अशा होणाऱ्या अपघातात बाबत केंद्रीय मानवधिकार आयोगाने देखील दखल घेतली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला चौकशी अहवाल देण्याबाबत सांगण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.