आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:तळोद्यात मुख्य रस्त्यांना महापुरुषांची नावे द्यावीत

तळोदा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने तळोदा नगरपरिषदेचे बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, नगरसेविका अनिता परदेशी यांनी व्यापारी संकुल, तसेच शहरातील रस्त्यांच्या नामकरणाबाबत मुख्याधिकारी सपना वसावा, नगराध्यक्ष अजय परदेशींकडे मागणी केली आहे.या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नगरपरिषदेच्या नूतन इमारतीखाली असणाऱ्या व्यापारी संकुलांना ‘यहा मोगी माता व्यापारी संकुल’ असे नाव देण्यात यावे. या व्यापारी संकुलाला देवी याहा मोगी मातेचे नाव दिले गेल्यास सर्व जाती धर्मातील लोकांसाठी व आदिवासी बांधवांसाठी ही गौरवाची तसेच आनंदाची बाब ठरेल. तसेच स्मारक चौक ते भगवान बिरसा मुंडा चौक या रस्त्याला भगवान बिरसा मुंडा मार्ग असे नाव देण्यात यावे. त्याचबरोबर बिरसा मुंडा चौक ते संत गुलाम महाराज प्रवेशद्वार या रस्त्याला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मार्ग असे घोषित करावे त्याचबरोबर बिरसा मुंडा चौक ते चिनोदा चौफुली या रस्त्याला अहिल्याबाई होळकर मार्ग म्हणण्यात यावे. त्याचबरोबर स्मारक चौक ते हातोडा रस्ता प्रवेशद्वार या मार्गाला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग संबोधण्यात यावे.

त्याचबरोबर स्मारक चौक ते कॉलेज चौफुली भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम मार्ग असे गौरविण्यात यावे. त्याचबरोबर स्मारक चौक ते कालिका माता मंदिर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग व एम. एस.ई.बी. ऑफिसपासून जाणारा नंदुरबार बायपास क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले मार्ग व भन्साली प्लाझा ते हायवे बायपास फातिमा शेख मार्ग असे संबोधण्यात यावे व या संदर्भात तसा ठराव करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी माहिती देते वेळी बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, नगरसेविका अनिता परदेशी, तसेच युवा नेते संदीप परदेशी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...