आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्व आढावा बैठक:जिल्ह्यात खरीप हंगामासाठी बियाणे अन् खते उपलब्धतेसाठी सूक्ष्म नियोजन करा;जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात शनिवारी खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक झाली

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जांचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हाचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात शनिवारी खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, आमदार डॉ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रधुनाथ गांवडे, कृषी सभापती गणेश पराडके, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधिकारी एल. डी. भोये आदी उपस्थित होते. पालकमंत्री ॲड. पाडवी म्हणाले की, खरीप हंगाम २०२२-२०२३ साठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून येणारे बियाणे चांगल्या दर्जाची असावे. राष्ट्रीय कृत बँकांनी कृषी कर्ज वाटपाला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...