आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहादा तालुक्यातील सुलतानपूर येथे दोघा डॉक्टरांकडे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे नोंदणी परवाना नसताना त्यांनी परवाना असल्याचे भासवून वैद्यकीय व्यवसाय केला. तसेच चुकीचे इंजेक्शन देऊन पंधरा वर्षीय मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने या दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे बोगस डॉक्टरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डॉ. राजेंद्र श्रीपद पाटील (५४) व डॉ. विनोद राजेंद्र पाटील ३१या दोघांनी सुलतानपूर येथे दवाखाना थाटला. ते सद्या शहादा शहरातील साई सेवाराम नगरात वास्तव्यास असून २२ ऑक्टोबर २०२२ रोजी मंगलाई क्लिनिकमध्ये चेतना दिगंबर पाटील या किशोरवयीन युवतीला चुकीचे इंजेक्शन दिल्याने ती मरण पावली. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर या दोघांकडे परवाना नसल्याचे उघड झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.