आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावीच्या पहिल्या मराठीच्या पेपरला शहरातील डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलच्या मागच्या बाजूने अनेक कॉपी पुरवणारे कॉपीबहाद्दर सर्रास कॉपी देण्यासाठी गेटवर चढून आत शिरतानाचे विदारक चित्र पाहायला मिळाले. परीक्षा सुटल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या ‘दिव्य मराठी’ने प्रतिक्रीया जाणून घेतल्या. जवळपास सर्वच मुलांना मराठीचा पेपर अत्यंत चांगला गेला. पेपर सोपा होता. कॉपी चालली नाही, असेच उत्तर ऐकायला मिळाले. दहावीच्या परीक्षांना गुरुवारी सुरुवात झाली असून तालुक्यात १६ तर नवापूर, शहादा, तळोदा, धडगाव, अक्कलकुवा या पाच तालुक्यात ३२ अशा ४८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडल्या. मराठीचा पहिला पेपर बोलीभाषेतला असल्याने सर्वांनाच चांगला गेला. दुपारी २ वाजून १० मिनिटांनी सर्वांचे पेपर सुपरवायझरांनी जमा केल्यानंतर बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर आनंदाचे भाव होते. दुपारी शिक्षणाधिकारी डॉ. मश्चिंद्र कदम, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांनी परीक्षा केंद्रांवर जावून कॉपी सुरू आहे का, याची पाहणी केली. मात्र त्यांना
कुठेही गैरप्रकार आढळून आला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच जिल्ह्यात पहिल्या दिवशी कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही, अशी माहिती दिली. परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक परीक्षा केंंद्राबाहेर पालकांचीही गर्दी होती. अनेक पालक आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रांवर सोडून घरी गेले तर काही पालक परीक्षा संपेपर्यंत बाहेरच थांबलेले पाहायला मिळाले. दुपारी पेपर सुटल्यानंतर माेहित राजपूत, नयन सुनील पटेल यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आेसंडून वाहत होता. पेपर सुटताच अनेक विद्यार्थी हातातील पॅड वाजवत बाहेर पडले. तर आता विद्यार्थी पुढील पेपरची तयारी करीत असून सोमवारी हिंदीचा पेपर आहे.
कॉपी पुरवणाऱ्यांचा घोळका : बाहेरून कॉपी पुरवणाऱ्यांचा घोळका सक्रीय दिसली. तोंडाला फडके बांधून भिंतीवरून उडी मारून ते कॉपी पुरवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसले; परंतु हे दृष्य पूर्वीच्या तुलनेत नगन्य होते. डाॅ. काणे गर्ल्स हायस्कूलच्या बाजूला असलेल्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या गेटवर चढून आवारात परीक्षा केंद्राच्या मागच्या बाजूने उडी मारून आत शिरताना दिसले. त्यानंतर काही मिनिटांनी ते बाहेरही पडले.
कमी वेळेत सोडवला
पूर्व परीक्षेपेक्षाही आजचा पेपरखूपच सोपा होता.कमी वेळेत पेपरलिहिला. त्यामुळे जास्तीची अतिरिक्त उत्तरेही सोडवली. - स्मिथ नीलेश गावित, परीक्षार्थी,नंदुरबार
पेपर खूपच सोपा
स्ट्रीक वातावरण होते. कॉपी करायला आमच्यावर्गात कुणालाचसंधी नव्हती.आम्ही मनाने पेपरसोडवला. पेपरखूप सोप्पा गेला. - तनुष्का वाडेकर, परीक्षार्थी, नंदुरबार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.