आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:बेघर संघर्ष समितीचा मागण्यांसाठी माेर्चा

नंदुरबार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने गोरगरीब कुटुंबांच्या राहत्या जागेचा सर्व्हे करून दिलेल्या यादीप्रमाणे निधी मंजूर करावा व म्हाडा योजनांनुसार घरकुल बांधून द्यावे तसेच भाडेकऱ्यांना घरकुल देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरातील जे गरीब कुटुंब शासनाच्या जागेवर २० ते २५ वर्षांपासून वास्तव्य करून आहेत अशा जागांचा सर्व्हे करून ते राहत असलेल्या ठिकाणी म्हाडा योजनेनुसार मोफत घरकुले बांधून द्यावी. जे लोक भाड्याच्या घरात राहून वाढत्या महागाईचा सामना करून घरभाडे भरत आहे.

एकीकडे शहरासह जिल्ह्यात कारखाने, उद्याेग नसल्याने घरातील कर्त्या व्यक्तीस काम मिळत नाही, नोकरी नाही. खोडाई माता टेकडी परिसरातील सर्व्हे क्रमांक २७१ व इमाम बादशाह टेकडी परिसरातील क्रमांक ४२७/१ सर्व्हे क्रमांक ४२७/२ वा शासकीय जागेवर म्हाडा योजनेनुसार घरकुल बांधून द्यावी, या मागण्यांचा समावेश आहे. मुस्लिम समाजात शाह, फकीर, शा लावणाऱ्यांना एनटी छप्परबंद जातीचे दाखले जातपडताळणी विभागातून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...