आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:शेतमजुरांना ३०० रुपये रोजसह नियमित वेतनासाठी शहाद्यात मोर्चा

शहादा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतमजुरांना तीनशे रुपये रोज मिळावे, नियमित वेतन लागू करावे, निवृत्ती वेतनात वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन शहादा तालुकातर्फे कॉम्रेड ईश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर १ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मोर्चा काढण्यात आला.

मोर्चात शेकडो ग्रामीण भागातील शेतमजूर व श्रमिक वर्ग सहभागी झाले होते. विशेषता महिला मोर्चेकरांची संख्या अधिक होती. शहादा नगरपालिका कार्यालयाला वळसा घालून मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर आणण्यात आला. कॉम्रेड ईश्वर पाटील व कार्यकर्त्यांनी प्रांतअधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांना निवेदन देण्यात आले. त्यात शेतमजुरांना तीनशे रुपये रोज मिळावे, शेतमजुरांना नियमित वेतन लागू करावे, शेतमजुरांच्या निवृत्ती वेतनात वाढ करावी, पंतप्रधानांनी घोषणा केल्याप्रमाणे सर्वांना घरकुले मिळावी आदी मागण्या केल्या.

बातम्या आणखी आहेत...