आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:रनाळे येथून अडीच लाखांचे साहित्य चोरी

रनाळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथील शिवारातून संरक्षण जाळी कापून चोरट्यांनी पोल्ट्री फार्ममध्ये घुसून ठिबक सिंचनासह इन्व्हर्टर व बॅटरी साहित्य चोरून नेल्याची घटना घडली. सुमारे अडीच ते तीन लाख रुपयाचे साहित्य चोरी गेले. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

नंदुरबार तालुक्यातील रनाळे शिवारात शरद नारायण तांबोळी यांचा पोल्ट्री फार्म आहे. त्या पोल्ट्री फार्मच्या संरक्षण जाळी कापून चोरांनी ४२ ठिबक सिंचनचे बंडल, एक इन्व्हर्टर व दोन बॅटरी यांच्यासह शेती लगत असणारे साहित्य चोरून नेले. साधारणता अडीच ते तीन लाख रुपयाचे साहित्य चोरून नेले आहे.

ठिबक सिंचनाचे बंडल शेती उत्पादन शेती उपयोगासाठी लागत असल्याने त्यांचा उपयोग करण्यापूर्वीच चोरट्यांनी चोरून नेली. घटनेची माहिती मिळताच नंदुरबार तालुका पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार, पोलिस निरीक्षक कमलाकर चौधरी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेटून पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...