आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:पावरी भाषा शब्दकोश साहित्य मंडळाची शहादा येथे बैठक

शहादा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे अखिल भारतीय पावरा-बारेला संघाच्या मार्गदर्शनाखाली पावरी भाषा शब्दकोश साहित्य मंडळाची बैठक झाली. बैठकीला अखिल भारतीय पावरा-बारेला समाजाचे अध्यक्ष नामदेव पटले, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता झेलसिंग पावरा, सेवानिवृत्त सहायक उपवनसंरक्षक सुरेश मोरे, वसंत पावरासह समाजातील साहित्यिक, कवी, महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.

गेल्या दोन वर्षांपासून पावरी भाषा शब्दकोशाचे शब्दांकन करण्याचे काम सुरू आहे. हा ७५०० शब्दांच्या शब्दकोष असणार असून पावरी भाषेवर आधारित सर्व सविस्तर माहिती पावरा समाजाचे साहित्य बोलीभाषा याच्या उल्लेख असणार असून, समाजातील सर्व कार्यकर्त्यांचे योगदान मिळत आहे. लवकरच हा शब्दकोश प्रकाशित होईल. पावरा-बारेला समाजातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी साहित्यिकांनी योगदान द्यावे. शब्दकोश हा एक प्रकारे सन्मान देणारा राहील म्हणून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नामदेव पटले यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...