आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्र स्पष्ट:कानळदे ग्रा.पं., सातुर्खे, अमळथेचे सदस्य बिनविरोध

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून माघारीच्या अखेरच्या दिवशी सदस्यांसाठी ४६६ पैकी १४८ उमेदवारांनी तर सरपंच पदासाठीच्या ९३ उमेदवारांनी माघार घेतली. यानंतर चित्र स्पष्ट झाले असून सरपंच पदासाठी ४७ तर सदस्य पदासाठी ३१८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माघारीनंतर कानळदे ग्रा.पं.च्या सरपंचपदी प्रमिलाबाई दशरथ पाटील यांच्यासह सर्व सातही सदस्य बिनविरोध झाले आहेत. तसेच सातुर्खे सर्व ७ आणि अमळथे ग्रा.पं.त देखील सातही उमेदवार बिनविरोध झाले आहेत. तसेच रनाळे ग्रा.पं.त एक उमेदवार बिनविरोध झाला. ढंढाणे ग्रा.पं.चे ४, ओसर्ली १, खैराळे १ व कोठडे ग्रा.पं.चाही १ सदस्य बिनविराेध झाला आहेत.

तालुक्यात खैराळे, कोठडे तिसी, कानळदे, करणखेडा, सातूर्खे, राकसवाडे, घूली, रनाळे, अमळथे, ढंढाणे, धानोरा, ओसर्ली, तलवाडे बुद्रूक, घोटाणे, चौपाळे, रजाळे व आसाणे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत होती. त्यामुळे दिवसभर तहसील आवारात प्रचंड गर्दी झाली होती. तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवासी नायब तहसीलदार बी.ओ. बोरसे, अमृतकर यांच्या मार्गदर्शनात १८ टेबल लावण्यात आले होते.

सरपंचासाठी १८ पैकी ७ ग्रा.पं.त सरळ लढत
कानळदे ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी एकच उमेदवार असल्याने सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. १८ पैकी ७ ग्रा.पं.मध्ये सरपंच पदासाठी सरळ लढत होणार असून ७ ग्रा.पं.मध्ये सरपंच पदासाठी तिहेरी लढत होणार आहे. कोठडे ग्रा.पं.त चौरंगी लढत होत आहे. कानळदे, अमळथे व सातुर्खे या तीन ग्रा.पं.त केवळ सात सदस्यांनी अर्ज भरले आहेत. आसाणे ग्रा.पं.त २५ सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कानळदे येथील सरपंचपदी प्रमिलाबाई दशरथ पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून सर्व सदस्यही बिनविरोध झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...