आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:बोरद चौफुलीवर गुटखा घेऊन जाणाऱ्या म्हसावदच्या व्यापाऱ्याला कारसह घेतले ताब्यात

बोरद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोरद आऊट पोस्टच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांचा पान मसाला गुटखा जप्त केला. याप्रकरणी एका व्यापाऱ्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

पपिल बाबूलाल जैन (वय ३०, रा.म्हसावद, ता.शहादा) हे कारमधून (एमएच ३९, एबी.७३३७) म्हसावद कडे जात असताना गुटखा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी त्यांची कार बोरद येथील शहादा चौफुलीजवळ अडवून तपासणी केली. यात १ लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचे तसेच १,१२,२०० रुपये किमतीचे त्याचबरोबर १३,२०० रुपये किमतीचे तसेच १९,८०० रुपये किमतीचे ३ सफेद रंगाच्या छोट्या गोण्या तसेच प्रत्येक गोणीत ४ प्लास्टिकचे कट्टे असे एकूण १२ कट्टे व प्रत्येक कट्ट्यात ५० व्ही १ नावाचे तंबाखूचे प्लास्टिकचे पाऊच ६०० प्रत्येक पाऊचवर छापील किंमत ३३ रुपये याप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस नाईक विजय गोपाल विसावे यांनी दिलेल्या
फिर्यादीवरून पपिल बाबूलाल जैन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी बोरद आऊट पोस्टचे हवालदार गौतम बोराडे, पोलिस शिपाई राजू जगताप, नीलेश खोंडे हे उपस्थित होते. अमलदार राजकुमार जाधव यांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक अविनाश केदार हे पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा यांच्या आदेशानुसार गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...