आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:नवापूर शहरातील भारनियमनाला अल्पसंख्याक समाजातर्फे विरोध, निवेदन देऊन भारनियमन बंद करण्याची मागणी

नवापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात भर उन्हाळ्यात व रमजान महिन्यात वीज वितरण कंपनीने भारनियमन सुरू केल्याने मुस्लिम सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. या संदर्भात नवापूर वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता हेमंत बनसोड व अभियंते भूषण राजपूत यांना निवेदन देऊन भारनियमन बंद करावे, अशी मागणी केली.

अल्पसंख्याक विकास परिषदेचे सचिव पमा सय्यद व पदाधिकारी यांनी दिले आहे. भारनियमन नवापूर तालुका तसेच शहरावर थोपवण्यात आले आहे, हे अगदी कायद्याबाहेरचे आहे. ते बंद करा किंवा त्याचा टाइम टेबल बदला. कारण मुस्लिम धर्माच्या पवित्र रमजान महिना सुरू असून मुस्लिम बांधवांचे रोजे आणि हिंदू धर्मातील लोकांचे नवरात्रीचे उपवास चालत आहे. तसेच उन्हाळयाचे दिवस असल्यामुळे दुसरीकडे तापमान वाढत आहे. शेतकऱ्यांचे हाल झालेले आहे. लहान लहान धंदे करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे दुकानात ग्राहक नाही, इन्वेटर बॅटरी लावण्याची ऐपत नाही. भारनियमात बदल करावा किंवा रद्द करावा. अन्यथा अल्पसंख्याक विकास परिषदेतर्फे आंदोलन छेडण्यात येई, असा इशारा दिला आहे. निवेदनावर संघटनचे सचिव पमा सय्यद, तोसिफ आमलीवाला, मुस्तुफा मनियार, समिर शेख, अरजान सय्यद, बिलाल सैय्यद, कामरान सय्यद, आबीद शेख, रय्याद शेख, साबीर काकर, अहेमत सैय्यद, शान सय्यद आदींचा सह्या आहेत.