आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागामध्ये आमदारांनी केली पाहणी

तळोदा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेलवाई परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या वादळी पावसाने शेतातील झाडे उखडून पडले असून, शेतीचेही नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याच्या सूचना आमदार राजेश पाडवी यांनी महसूल प्रशासनाला दिल्या आहेत.

तळोदा शहरासह पश्चिम भागात शनिवारी वादळी पावसाने नागरिकांची व शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेलवाई, मोदलपाडा, रतनपाडा या भागातील घरांची पडझड होऊन काही घरांचे पत्रे उडाली. शेलवाई येथे साधारणतः ५० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी आमदार राजेश पाडवी, प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, प्रवीण वळवी, तहसीलदार गिरीश वखारे, मंडळ अधिकारी चुडामण सरगर, समाधान पाटील आदींनी केली.

आमदार निधीतून भरपाई देण्याची मागणी करणार
गेल्या दोन वर्षांपासून एकही नुकसानग्रस्तांना शासनाकडून भरपाई मिळालेली नाही. याबाबत प्रशासन, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन नुकसानग्रस्तांना स्थानिक आमदार निधीतून भरपाई देण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणार आहेत.
राजेश पाडवी, आमदार

बातम्या आणखी आहेत...