आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या धोरणांना विरोध:आंदोलनांचा सोमवार; भाजपतर्फे पालिकेचा निषेध, केंद्राच्या विरोधात सरकारी कर्मचाऱ्यांचाही संप

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांची नावे फलकावर लिहिणाऱ्या नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी आंदोलन करून निषेध केला. दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून दोन दिवसीय संपाचे हत्यार उपसले आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले. जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन झाले. एकूणच सोमवार हा आंदोलनाचा वार ठरला.

घरपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांची नावे फलकावर लिहून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिष्ठेचे हनन करणाऱ्या पालिका सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त करीत भाजपने सोमवारी जोरदार आंदोलन केले. नाट्यमंदिर, इंदिरा मंगल कार्यालय, सीबी रघुवंशी बागेची घरपट्टी भरणार नसाल तर येत्या आठवड्याच्या आत या सर्व संस्थांना टाळे लावले जाईल, असा इशारा यावेळी भाजपतर्फे देण्यात आला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, नगरसेवक चारूदत्त कळवणकर, प्रशांत चौधरी, भाजपचे नीलेश माळी, भीमसिंग राजपूत, रत्नदीप पाटील आदींनी पालिका सत्ताधाऱ्यांचा जोरदार निषेध केला. या वेळी घोषणाबाजी करण्यात आली.

नाट्यमंदिर, इंदिरा मंगल कार्यालयाची घरपट्टी भरा

जुन्या पालिकेच्या चौकात भाजपने लावला फलक
जुन्या पालिकेच्या चौकात भाजपने निदर्शने केली. करोडो रुपये घरपट्टी बगलबच्च्यांना माफ करून गरिबांना घरपट्टी वसुली करून पिळवणूक करणार का? असा प्रश्न असलेला फलक भाजपच्या वतीने लावला आहे. सीबी गार्डन, नाट्यमंदिर, वॉटर पार्क, इंदिर मंगल कार्यालय या इमारतींची घरपट्टी बाकी आहे, असेही फलकावर म्हटले आहे.

पठाणी वसुली तत्काळ थांबवत दिलासा द्यावा : शिरीष चौधरी
माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी आपले मित्र असलेल्या भागीदारांना कराराने वास्तू दिल्या आहेत. मात्र त्यांना कर म्हणून आकारण्यात आलेला नाही. आपले ते बाळ दुसऱ्याचे ते कार्टे असे रघुवंशींचेे धोरण आहे. पालिकेने पठाणी वसुली सुरू केली आहे. ही पठाणी वसुली थांबवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

नगरपालिकेकडून अन्याय : चौधरी
विजय चौधरी म्हणाले, पालिकेने सर्वसामान्यांवर अन्याय चालवला आहे. पालिकेला लुटणारे नेतृत्व मिळाले आहे. गटारीत करोडोंचा भ्रष्टाचार झाला आहे. आता जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...