आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारंगखेड्याचे आकर्षण - दीड कोटीची ‘शनाया’:चेतक फेस्टिव्हलमध्ये 1 हजारांहून अधिक घोडे खरेदी-विक्रीसाठी दाखल

हर्षल सोनवणे / पुरुषोत्तम आगळे | शहादा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सारंगखेडा येथे दत्तजयंतीपासून यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या यात्रोत्सवातील चेतक फेस्टिव्हल देशभरात प्रसिद्ध आहे. येथे १ हजारांहून अधिक घोडे खरेदी-विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यंदा उत्तर प्रदेशातून आलेल्या १ कोटी ५१ लाख रुपयांच्या ‘शनाया’ या घाेडीचे विशेष आकर्षण आहे.

महिन्याला होतो ७७ हजारांचा खर्च : ७० इंची उंची अन् ४ वर्षे ४ महिन्यांचे वय असलेली ‘शनाया’ घोडी नुकरा प्रजातीची आहे. तिच्या देखरेखीसाठी दोन सेवक २४ तास कार्यरत असतात. तिच्यासाठी स्वतंत्र खोली तयार केली आहे. पंजाबमधील जक्तार सिंग यांनी शनायाची बोली ७१ लाख रुपये लावली होती; परंतु अब्दुल खालिद यांनी ती विकली नाही.

खानपानावर भर... : ‘शनाया’ला सकाळ-सायंकाळ प्रत्येकी ७ लिटर दूध दिले जाते. चणे, मका, गहू, बाजरी, ज्वारीचा भुसा, शिवाय शेताच्या बांधावरील ताजा चारा खायला दिला जातो. महिन्यातून ३-४ वेळा काजू, बदाम खाऊ घातले जातात.

भारतातील सर्वात उंच घोडी : ^ही भारतातील सर्वात उंच घोडी गुलझार वंशाची आहे. तिला एक १६ महिन्यांचे शिंगरू आहे. तिचा जन्म शनिवारी झाला होता म्हणून तिचे नाव शनाया ठेवण्यात आले. - राज अब्दुल खालिद, घोडीचे मालक

बातम्या आणखी आहेत...