आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पाताळगंगा नदीवरील पुलावरून सर्वाधिक वर्दळ; धोकाही अधिक

नंदुरबार19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शिवण, पाताळगंगा नद्यांवरील पूल जुने झाले असून त्यांचे संरक्षण कठडे तुटल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. पावसाळयात तर जाेरदार पाऊस झाला तर पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे कठडे बांधून अपघाताचा धोका कमी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शहरानजीक पाताळगंगा नदीवर छोटा पूल आहे. या पुलावरून शासकीय वाहने रोज ये-जा करतात. नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, न्यायालय, पोलिस अधीक्षक कार्यालयांकडे जाण्यासाठी याच पुलाचा वापर करावा लागतो. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.

वाहने नदीत कोसळून वाहून जाण्याची भीती
शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या शिवण नदी पुलावरही कठडे नसल्याने भरधाव वाहणारे वाहन कधीही नदीत कोसळू शकते. त्यामुळे या पुलावर कठडे बांधून संरक्षण दिले पाहिजे. शिवण नदीवरील पुलाची लांबी ३०० मीटर तर खोलीही १७ फुटापर्यंत आहे. कठडे बांधण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकामा विभागाची असल्याचे अभियंता जी.एस. गावीत यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

ट्रॅक्टर नाल्यात पडले; अंधारामुळे नाला दिसेना
^नाल्यावर अरुंद रस्ता असल्याने रात्री साक्रीकडे जाणाऱ्या व साक्रीकडून येणाऱ्या वाहनांना रस्त्याच्या बाजूला असलेला नाल्याचा खोल भाग दिसत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. एक महिन्यापूर्वी याच भागात ट्रॅक्टर पलटी झाले होते. सुदैवाने चालक वाचला. मात्र त्याला मुका मार लागला होता. त्या सोबत असलेला बालकही वाचला. अंधारामुळे या रस्त्याच्या बाजूचा नालाच दिसत नाही.-उद्धव पाटील, नंदुरबार.

बातम्या आणखी आहेत...