आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्याने मराठी शाळेत पटसंख्या कमी होतेय. विद्यार्थ्यांनी कपड्यांची नव्हे तर अभ्यासाची स्पर्धा करावी. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले. त्यामुळे मोबाइलचा अतिवापर टाळा. बालवयापासून वाचनाची सवय करा. संस्काराची शिदोरी आयुष्यात महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी थोड्या यशाने भारावून न जाता जीवनात जिद्दीने उच्चतम यशोशिखर गाठण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी केले.
येथील शेठ व्ही. के. शाह विद्या मंदिर व (कै.) सौ. जी. एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा झाला. त्यावेळी मोतीलाल पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी दिनेश सिनारे, सारंगखेडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भगवान कोळी, संस्थेचे व्हा.चेअरमन हिरालाल पाटील, प्र. प्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापक एस.डी. भोई, पर्यवेक्षक एच.जी. पाटील, व्ही. आर. पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापक एस.डी. भोई यांनी केले.
निश्चित ध्येय ठरवून अभ्यास केल्यास हमखास यश
बालवयात शिस्त महत्त्वाची असते. शाळेत शिक्षक शिस्त लावतात. स्पर्धा स्पर्धेपुरती मर्यादित ठेवावी. जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द महत्त्वाची आहे. नियमित अभ्यासाने ज्ञानात वाढ होते. शिवाय मोठे होऊन आपल्याला काय व्हायचे आहे हे ठरवून त्या दिशेने अभ्यास केल्यास निश्चितच स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास यश मिळते. त्यासाठी वाचन गरजेचे आहे, असे उपनिरीक्षक भगवान कोळी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांशी संवादही साधला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.