आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गव्हाच्या प्रेमात:मुंबई, गुजरात नंदुरबारच्या गव्हाच्या प्रेमात

नंदुरबार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची प्रचंड आवक सुरू आहे. आतापर्यंत १५ हजार क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तापी काठावर दर्जेदार गव्हाचे उत्पादन होते. हा गहू इतरांच्या तुलनेत चवदार, जाड व स्वच्छ असल्याने त्याला मागणी अधिक आहे. या वैशिष्ट्यांमुळे मुंबई, पुणेसह नंदुरबार जिल्ह्यालगत असलेल्या गुजरात व मध्य प्रदेशातूनही नंदुरबारच्या गव्हाला अधिक पसंती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.

नंदुरबार हे गुजरात व मध्य प्रदेशाच्या सीमेवर असल्याने या भागातील कुठल्याही पिकांना तीन राज्यातील व्यापारी, शेतकऱ्यांना फायदा होत असतो. यंदा मार्चपासून गव्हाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. मार्च अखेरमुळे चार दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज बंद होते. त्यानंतर सोमवारी पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समिती खुली झाली.

बातम्या आणखी आहेत...