आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयुर्वेदातील नाडी परीक्षा हे शास्त्र आहे. त्यातून अनेक व्याधींचे अचूक रोगनिदान होतेच, पण रुग्णाला भविष्यात होणाऱ्या दुर्धर आजारांचा अंदाजही बांधता येतो, असे प्रतिपादन प्रांताधिकारी उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी सारंगखेडा येथे नाडी तपासणी व आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रसंगी केले.
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे चेतक फेस्टिव्हल समिती आयोजित विशाल योग महोत्सवात नाडी तपासणी आणि आयुर्वेदिक आरोग्य शिबिराला सुरुवात झाली. उद्घाटन प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी तहसीलदार डॉ. मिलिंद कुळकर्णी, चेतक फेस्टीव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल म्हणाले चेतक महोत्सवाची सुरुवात आरोग्याने करावी असा विचार मनात होता. परिसरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे हा उद्देश ठेवून आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे. आरोग्य धनसंपदा आहे. यावेळी सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते ब्रिजलाल पाटील, आचार्य आनंदजी, आचार्य संजीवजी, डॉ .मुकेश योजी, डॉ. महेंद्र शर्मा, डॉ. गजानन कानापनावर, रणवीरसिंह रावल, ग्रामविकास अधिकारी पी.डी. पाटील, मंडळ अधिकारी जुबेर पठाण, तलाठी एन. डिगराळे आदी उपस्थित होते.
प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे म्हणाले की, या प्राचीन
शास्त्राचा वापर आजच्या आधुनिक युगातही केला व त्याद्वारे रुग्ण चिकित्साही अचूक केली जाते. शरीराचा सूक्ष्म अभ्यास नाडी परिक्षेमुळे होतो व रुग्णाना त्याचा अधिकाधिक फायदा देता येतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरीफ शहा यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी राजू तावडे, रमेश पाटील, संतोष मोरे, शरद शिरसाठ, गणेश कुवर यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन संदीप साठे यांनी केले. आभार पुरुषोत्तम आगळे यांनी मानले.
चेतक पुरस्कार देऊन सन्मान
या वेळी चेतक फेस्टिव्हल समिती मार्फत कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा चेतक सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केला. यात डॉ. फिरोज शहा, डॉ. सुभाष जैन, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. योगेश पाटील, डॉ. दिनेश भामरे, डॉ. सुरेश बोरसे, डॉ. संजय मोरे, प्रदीप कोळी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ चंद्रशेखर पाटील आदींचा समावेश होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.