आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळीत हंगाम सुरू:नागाईचे 8  लाख मॅट्रिक टनचे उद्दिष्ट; गाळपच्या दिवशी होणार भाव जाहीर

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पुरुषोत्तमनगर येथील साखर कारखाना साइटवर नागाई देवी शुगर लिमिटेड नंदुरबारचे चेअरमन डॉक्टर रवींद्र चौधरी व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते सपत्नीक पूजा विधी करून अग्निप्रदीपन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा साखर कारखाना चेअरमन दीपक पाटील होते. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले असून याच दिवशी शेतकऱ्यांच्या उसाला भाव जाहीर करण्यात येणार आहे.

तर यंदा कारखान्याने ८ लाख मॅट्रिक टन उसाच्या गाळपचे उद्दिष्ट ठेवले आहे. अग्निप्रदीपन कार्यक्रमाला सातपुडा साखर कारखाना व्हाइस चेअरमन प्रेमसिंग आहेर, शहादा तालुका खरेदी- विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, बाजार समितीचे उपसभापती रवींद्र रावल, पंचायत समिती माजी सभापती उद्धव पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, सुनील रोहिदास पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...