आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:पिंगाणे येथे नाईक महाविद्यालयाने‎ राबवले आरोग्य संवर्धन अभियान

शहादा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील वसंतराव नाईक वरिष्ठ ‎महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास ‎विभागाकडून शहादा तालुक्यातील ‎पिंगाणे गावात महिला आरोग्य‎ संवर्धन ऋतुमती अभियान‎ राबवण्यात आले. यात‎ महाविद्यालयाचा आजी-माजी‎ राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविकांनी ‎पिंगाणे गावात सर्वेक्षण करून‎ महिला आरोग्याशी संबंधित समस्या ‎ ‎ जाणून घेतल्या. संबंधित महिला ‎वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी एक‎ प्रश्नावली तयार केली होती.

यात‎ प्रामुख्याने त्यांचे नाव, वय, वजन,‎ उंची, विवाहित, अविवाहित,‎ अपत्यांची संख्या, लग्न होऊन‎ लोटलेला काळ, वार्षिक उत्पन्न,‎ प्रथम मासिक धर्म येण्याचे वर्ष, यात‎ नियमितता अनियमितता किती? वा‎ सलग येणे, यादरम्यान होणारा त्रास,‎ यासाठी दवाखान्यातून घेतलेले‎ उपचार, मासिक धर्म बंद होण्याचे‎ वर्ष, यानंतर उद्भवणाऱ्या समस्या‎ यासारखे प्रश्न विचारून त्यांच्या‎ समस्यांचे शक्य तेवढे निराकरण‎ करण्याचा प्रयत्न केला. सोबतच‎ महिला वर्गाची संबंधित इतर‎ माहितीही त्यांनी जाणून घेतली.‎

पिंगाणे गावातून या अभियानाला‎ चांगला प्रतिसाद मिळाला. या‎ अभियान ईशा बोरसे, वर्षा पाटील,‎ ‎रेणुका कुवर, आराधना माळी,‎ गीतांजली गिरासे, गायत्री गिरासे या‎ आजी-माजी राष्ट्रीय सेवा योजना‎ स्वयंसेविकांनी महाविद्यालयाचे‎ प्राचार्य डॉ. ए. एन. पाटील, विद्यार्थी‎ विकास अधिकारी प्रा. डॉ. डी. वाय.‎ पाटील, विद्यार्थी विकास सहाय्यक‎ महिला अधिकारी प्रा. मालिनी‎ अढाव यांच्या मार्गदर्शनात‎ राबवण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...