आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबार:तोरणमाळ सिंदिदिगर रस्त्यावर कार दरीत कोसळली, भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू; चार गंभीर जखमी

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपघात होताच स्थानिकांनी मदतकार्यास सुरुवात केली आहे.

सातपुडा पर्वतरांगेत असलेल्या तोरणमाळ ते सिंधीदिगर घाटात एका प्रवासी (क्रुझर) वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन दरीत कोसळले. यात आठ जण जागीच ठार झाले असून अन्य १५ जण जखमी झाले आहेत. या वाहनातून तब्बल ३० जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. वाहनाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून प्रवाशांचे मृतदेहही विखुरले गेले होते. तोरणमाळ ते खडकी व खडकी ते सिंधीदिगर हा संपूर्ण घाटाचा रस्ता आहे. रविवारी दुपारी मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यातील एक भजनी मंडळ शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन येथे भजनाच्या कार्यक्रमासाठी येत असल्याची माहिती प्राथमिक माहिती आहे. सायंकाळच्या वेळी सिंधी ते खडकी दरम्यान चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ते दरीत जाऊन कोसळले. त्यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.

यात गुमानसिंग तुळशिराम (रा. शेमलेट,), वेरांग्या धनसिंग (रा. शेमलेट), कमल रेहमसिंग (रा. खेरवाणी), मुन्नालाल तडवी (रा. चेरवी), खागीराम ठुंडला (रा. चेरवी), भाकीराम सेवा (रा. शेमलेट, सर्व मध्य प्रदेश) यांच्यासह अन्य दोघांचा मृतांमध्ये समावेश आहे. चालक राकेश तुळशिराम याला ब्रेक फेल झाल्याचे कळताच त्याने उडी घेऊन स्वत:चा जीव वाचवला. मात्र, अन्य प्रवाशांना त्याच्यामुळे जीव गमवावा लागला. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. जखमींची नावे उशिरापर्यंत मिळू शकलेली नाही.

खडकी व सिंधी परिसरातील आदिवासी बांधवांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. जखमींना बाहेर काढून तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. रात्री उशिरापर्यंत दरीत जखमींना आणि मृतांचे शव बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनेचा आढावा घेतला असून, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, म्हसावद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवारसह अन्य कर्मचारी दाखल झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...