आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेमडेसिवीरचा काळाबाजार:नंदुरबारचे जिल्हाधिकारी आणि रोटरी वेलनेस सेंटरने रेमडेसिव्हीरचा साठा बाहेर विकला-हीना गावित

नंदुरबार16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाने विक्रम मोडले, एका दिवसात सापडले तब्बल 3.15 लाख नवे रुग्ण

राज्यात एकिकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे तर दुसरीकडे काळाबाजारही मोठ्या प्रमाणावर होत आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलेली आपल्याला पहायला मिळत आहे. यातच आता नंदुरबारच्या भाजप खासदार डॉ. हिना गावित यांनी रेमडेवीर इंजेक्शनवरुन जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णालयात रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सची गरज असताना जिल्हाधिकारी आणि रोटरी वेलनेस सेंटरने मिळून रेमडेसिव्हीरचा साठा बाहेर विकला, असा आरोप गावित यांनी केला आहे.

एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन हीना गावित म्हणाल्या की, 'नंदुरबार जिल्ह्यातील गावोगावी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. दवाखान्यांमध्ये आज रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सची मोठी गरज भासत आहे. मला दिवसातून प्रत्येक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दोन ते तीन वेळा फोन केला की, आमच्याकडे इतके रुग्ण आहेत पण आमच्याकडे इंजेक्शन नाही. रुग्णालयांना इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती केली. ज्या प्रमाणे रोटरी वेलनेस सेंटरला इंजेक्शन उपलब्ध करुन दिले, तसेच दवाखान्यांनाही हे इंजेक्शन उपलब्ध करुन द्या. पण जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. शेवटी मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त ५०० इंजेक्शन दवाखान्यांना दिले. रोटरी वेलनेस सेंटरला १ हजार इंजेक्शन देण्यात आले होते. दवाखान्यांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांना इंजेक्शन मिळाले नसल्याचे कळाले. रोटरी वेलनेस सेंटरने हे इंजेक्शन बाहेरच्या बाहेर विकले. नंदुरबारचे जिल्हाधिकारी आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मिळून हे काम केले', असा गंभीर आरोप हीना गावित यांनी केला आहे.

कोरोनाने विक्रम मोडले, एका दिवसात सापडले तब्बल 3.15 लाख नवे रुग्ण

देशात बुधवारी ३.१४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. १५ महिन्यांच्या कोरोना काळात एखाद्या देशात एक दिवसात आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वात मोठी आहे. एवढेच नव्हे, बुधवारी देशात २,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असली तरी अमेरिकेच्या तुलनेत ती निम्मी आहे. देशात नव्या रुग्णांची संख्या १ वरून ३ लाख होण्यासाठी फक्त १५ दिवस लागले. या काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतही संसर्ग वेगाने वाढला. ६ एप्रिलला देशात १ लाख रुग्ण आढळले तेव्हा त्यात महाराष्ट्रातील ४८% रुग्ण होते.

बातम्या आणखी आहेत...