आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस दल:बालविवाह थांबवण्यात नंदुरबार जिल्हा पोलिस दलास मिळाले यश ; पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांना माहिती कळवण्यात आली

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी कार्यालयाला तक्रार प्राप्त झाल्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात मोलगी पोलिसांना यश मिळाले आहे. २ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात, अल्पवयीन मुलीचे तिच्या इच्छेविरुद्ध ३ जून रोजी काकरपाडाचा पाटील पाडा, ता. धडगाव येथील एका तरुणाशी विवाह होणार असून विवाहाचे वेळी मुलीचे वय कायद्याने कमी आहे, असा तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडून जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांना माहिती कळवण्यात आली. सदर तक्रार गंभीर होती. त्यामुळे त्यांनी तत्काळ मोलगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धनराज निळे यांना संबंधितांच्या भेटी घेवून तातडीने विवाह थांबवण्याबाबत आदेश दिले. सपाेनि धनराज निळे यांनी मुलाचे वडील शांताराम मुंगा वसावे, रा. काकरपाडाचा पाटील पाडा व मुलीचे वडील रायसिंग वेस्ता पाडवी, रा. गदवाणीचा कारभारीपाडा, ता. अक्कलकुवा यांना तत्काळ मोलगी पोलिस ठाण्यात बोलावले. प्रभारी अधिकारी निळे यांनी दोन्ही पक्षाकडील लोकांना व त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना मुलीचे वय १७ वर्षे असून ती अल्पवयीन आहे. तसेच कायद्याने मुलीचे लग्नाचे वय १८ वर्षे निश्चित केले आहे. त्यामुळे आपण जर मुलीचे लग्न केले तर तो कायद्यानुसार गुन्हा ठरेल. दोन्ही पक्षाकडील लोकांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे मान्य करून जबाब व हमीपत्र लिहून दिले.

बातम्या आणखी आहेत...