आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापुरमध्ये वाइन शॉप वरून राजकारण:भाजप नेत्याने शेअर केला काँग्रेस नेत्याचे वाइन शॉप खुले असल्याचा व्हिडिओ, प्रशासन म्हणे - सर्व नियमात!

नवापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भरत गावीत यांनी वाईन शॉप सुरू असल्याचा व्हिडिओ केला सोशल मीडियावर शेअर

शहरात रमजान ईद व अक्षय तृतीय दिवशी गांधी पुतळ्याजवळील एमडी वाईन शॉप सुरू असल्याचा व्हिडिओ भाजप तालुकाध्यक्ष भरत गावीत यांनी केल्याने त्यावेळी थेट भरत गावित यांनी एमडी वाईन शॉप जवळ व्हिडिओ केला आहे. त्या दरम्यान त्यांनी सांगितलं की सव्वा वाजले आहे. आज रमजान ईद आहे नियम सर्वांना सारखा आहे परंतु दारूचे दुकान उघडे आहे हे वाईन शॉप का उघडे आहे. नवापूरच्या जनतेने बघावं नियम कोणासाठी आहे. यांच्या जवाब संबंधित विभागाने जनतेला द्यायचे आहे. शासनाने यांना नियमाची परवानगी दिली आहे. जनतेला सर्व नियम लागू आहे यांना का नाही असा व्हिडिओ भाजपाचे तालुकाध्यक्ष भरत माणिकराव गावित यांनी केला आहे का ?

पोलिस प्रशासन व नगरपालिका कारवाई करेल का असा सवाल उपस्थित केला आहे सर्वसामान्य जनतेचा दुकान बंद करण्यामध्ये नवापूर पोलिस व नगरपालिका प्रशासन धाडस दाखवत आहे. परंतु दारूचे दुकान वाईन शॉप बंद करण्यामध्ये अजूनही त्यांनी धाडस दाखवलेला नाहीये अशी चर्चा शहरात सुरू आहे. यासंदर्भात पालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाने कारवाई करण्यासंदर्भात पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना विचारणा केली असता त्यांनी योग्य चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

एमडी वाईन शॉपचे संचालक तथा नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की जिल्हाधिकाऱ्याने वाईन शॉपला होम डिलिव्हरी सुविधा देण्याचे आदेश दिले आहे. सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पार्सल देण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही एक शटर बंद करून लहान शटर उघडे करून पार्सल देत होतो. त्या दरम्यान हा व्हिडिओ करण्यात आला आहे. आम्ही नियमाचे पालन करत आहोत.

नवापूर शहरातील एमडी वाईन शॉप चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नवापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश चौधरी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदर वाईन शॉप सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उघडे ठेवण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहे. त्याची पार्सल सुविधा देण्यासाठी आदेशात म्हटले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशात सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मद्याची होम डिलिव्हरी करण्याचे आदेशात उल्लेख केला आहे.

बातम्या आणखी आहेत...