आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नंदुरबार:मणिबेलीच्या शाळेला दोन्हीही बाजूने सरदार सरोवराच्या पाण्याने घेरले, अनेकांच्या शेत जमिनी पाण्याखाली

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मणिबेलीच्या शाळेला दोन्ही बाजूने सरदार सरोवरच्या पाण्याने घेरले आहे. गेल्यावर्षी ही 5 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालात जीवनशाळेच्या मुलांनी धरणे दिले होते व मागणी केली होती की आमची मूळ शाळा सरदार सरोवर मुळे बुडाली त्या शाळेच्या बदल्यात आम्हाला शासनाने नवीन पण साधीच शाळा बांधण्याची मागणी केली होती. डॉ. राजेंद्र भारुड जिल्हाधिकारी महोदयांनी ही नर्मदा विकासला याबाबत आदेश दिले होते. परंतु कार्यवाही अद्याप झालेली नाही.

आता पाणी जवळ आले आहे ,साप, विंचू, मगरीचे भय आहे. आरोग्य दवाखाना कधी असतो कधी नसतो. गुजरात शासन मणिबेलीच्या तडवी परिवारांचे पुनर्वसन करीत नाही, महाराष्ट्राच्या जिल्हाधिकारी नी लिहिलेल्या पांच स्मरणपत्रची दखल घेत नाही. दरवर्षी घरे आणि जमिनी पिकांसह बुडितात जातात त्याची नुकसान भरपाई मिळत नाही. गेल्यावर्षी मणीलाल गोवाल यांचे घर व जमीन उभ्यापिकासह बुडितात गेली व अक्कलकुवा तहसील कडून त्या कुटुंबाला 10 कीट रेशनधान्य वाटपाला गेले होते. त्या कुटुंबाने ही शासनाने केलेली थट्टा रुपी मदत घेण्याचे नाकारले.

गेल्या वर्षी जी घरे बुडितात आली होती ती ह्या वर्षीही बुडितात आली. त्यांना नर्मदा विकासने पत्र्याचे शेड राहण्यासाठी बांधून दिले म्हणजे शासनाची जबाबदारी संपली असे शासनाला वाटते. परंतु घर बुडितात जात होते म्हणून त्या कुटुंबाला बांधून दिलेला चांदीचा बंगला(पत्र्याची शेड)व त्या कुटुंबाला सुरक्षित स्थळी आणले. पण त्याची शेती कशी वर आणणार? ती तर खालीच राहिली. त्यांचे उदरनिर्वाहाचे ते एकमात्र साधन. ते तर गेल्यावर्षी ही उभ्यापिकासह पाण्यात गेले व यावर्षीही पाण्यातच गेले.

मुलांची मागणी आहे की आम्हाला सुरक्षित स्थळी शाळेची जागा लेव्हल करून आमच्या आदिवासी घरांसारखी घरांची शाळा बांधली तरी चालेल, गुजरातमध्ये जाणारे म्हणतात आम्हाला दिलेल्या जमिनीवर जो झाडोरा उभा आहे, सिंचन सुविधा नाही व उंच सखल भाग आहे तो एक सारखा करून द्या. आम्ही शिफ्ट व्हायला तयार आहोत. ज्यांची घरे बुडितात जातात त्यांची मागणी आहे की आम्हाला भूमिहीन घोषित केले तरी चालेल पण करा व आमचेही पुनर्वसन करा. एवढीच मागणी आहे.

नर्मदा किनारच्या गावांमध्ये घरांजवळ पाणी आल्यामुळे दररोज जीव मुठीत धरून लोकं जगत आहेत.कधी कुणाला सर्पदंश होईल, मगर घरात शिरेल याचा नेम नाही.एक प्रकारे रामभरोसे जीवन जगत आहेत .आतातरी शासनाने आपली जबाबदारी पार पाळावी. प्रकल्पग्रस्त होणं हा गुन्हा आहे की पूर्वजन्माच पाप आहे.अशी लोकांची समजूत होऊ नये असे मला वाटते.

- चेतन साळवे (नर्मदा बचाव कार्यकर्ता)

अतिशय गंभीर स्थितीत जीवनशाळा मणिबेलीचे विद्यार्थी आहेत,प्रकल्पबाधितांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेऊन बेकायदेशीर बुडीत आणणे व महाराष्ट्र शासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे हे अतिशय खेदजनक आहे,नारायण भाईंना व नटवर भाईंना बांधून दिलेल्या शेडमध्ये अजूनही लाईट नाही,साप,विंचू पासून कसे वाचायचे? मणिबेलीतील उपकेंद्र आजही बंद अवस्थेत आहे,कधी उघडणार उपकेंद्र? कधी मिळणार आरोग्यसेवा ?

- लतिका राजपूत (नर्मदा बचाव कार्यकर्ता)

बातम्या आणखी आहेत...