आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंद:नंदुरबारच्या तापमानात 1 अंशाने घसरण; 10.7 अंशांची झाली नोंद

नंदुरबार7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह परिसराचे तापमान घसरले असून रविवारी १०.७ सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना हुडहुडी भरून लागली आहे. गेल्या वर्षी कडाक्याची थंडी पडली होती. जिल्ह्यातील तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत पोहाेचले होते. तसेच तोरणमाळ व डाब येथे तापमानाचा पारा खाली उतरला होता. काही दिवसांत अजून पारा घसरण्याची शक्यता आहे.

सकाळी नियमित फिरण्यासाठी येणारे व मैदानावर व्यायामासाठी येणाऱ्यांची गर्दी आता थंडीमुळे वाढू लागली आहे. तर पायी फिरणारे थंडीमुळे थोडे उशिराने बाहेर पडत आहे. त्यातही स्वेटर, टोपीचा वापर आता नागरिकांना करावा लागत आहे. थंडी वाढल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावरील वर्दळ कमी होताना दिसत आहे; परंतु थंडीचे आगमन झाल्याने नागरिक त्याचा आनंद घेत आहे. स्वेटर विक्रेत्याकडे नागरिकांची खरेदीसाठी गर्दी वाढलेली आहे. मात्र असे असले तरी थंडीच्या दिवसांत नागरिकांनी आरोग्यही जपावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...