आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:नंदुरबारहून अक्कलकोट; अष्टविनायकसाठी बसेस

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभाग अंतर्गत तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र भेट देण्याकरिता पॅकेज टूरद्वारे सुरक्षित व किफायतशीर दराने भाविकांना धार्मिक स्थळांच्या भेटी करिता नियोजन करण्यात आले आहे. येत्या ५ नोव्हेंबर रोजी अष्टविनायक आणि अक्कलकोट अशा दोन स्वतंत्र मार्गावर एसटी जाणार असून भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आगार प्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.

धुळे विभागीय नियंत्रक विजय गिते यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थक्षेत्र भेटींचे नियोजन करण्यात आले असून, भाविकांचा प्रतिसाद लाभत आहे. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता नंदुरबार अष्टविनायक दर्शन यात्रेस प्रारंभ होईल. शिर्डी, ओझर, लेण्याद्री, महाड, पाली, थेऊर, मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव, शनि शिंगणापूर, देवगड या स्थानांचा समावेश आहे. ऑनलाइन देखील आरक्षण करता येणार असून अष्टविनायक दर्शन यात्रेसाठी प्रवास भाडे प्रौढकरिता २१९० रुपये आणि ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी ११०० रुपये प्रवास भाडे लागेल. याशिवाय नंदुरबार अक्कलकोट दर्शन यात्रा ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता प्रारंभ होईल. अक्कलकोटसाठी प्रवास भाडे प्रौढ १९३० रुपये आणि ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी ९७० रुपये एवढे प्रवास भाडे लागेल.

बातम्या आणखी आहेत...