आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:नंदुरबार ते वडझाकण बस बंदमुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची होतेय गैरसाेय

नंदुरबार2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार आगारातून नंदुरबार ते वडझाकण सकाळी ८ वाजेची बंद असलेली बसफेरी पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. या मागणीच्या निवेदनाची दखल घेत ही बसफेरी सुरू करण्याचे आश्वासन आगारप्रमुख मनोज पवारांनी दिले.नंदुरबार तालुक्यातील वडझाकण गावासाठी नंदुरबार आगारातून दररोज सकाळी ८ वाजता नंदुरबार ते वडझाकण बस सुरू होती. परंतु मागील काही महिन्यांपासून नंदुरबार ते वडझाकण सकाळी ८ वाजेची बस बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यास उशिर होतो.

तसेच दुसऱ्या खाजगी प्रवासी वाहनाने ते वेळेवर पोहचू शकत नाहीत. गावातून अनेक रहिवाशी नंदुरबार येथे कामाला जातात. तसेच विद्यार्थी शिक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये जातात. म्हणून सकाळी ८ वाजेची बस बंद असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशींचे हाल होत आहेत. म्हणून वडझाकण गावांपर्यंत सकाळी ८ वाजेची नंदुरबार-कोकणीपाडा- वडझाकण अशी बसफेरी पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील कोकणी, नंदुरबार उपतालुकाध्यक्ष विनोद वसावे, उपशहराध्यक्ष संतोष पेंढारकर, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण जोशी, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष राम ठक्कर, प्रसिध्दीप्रमुख कल्पेश माळी, विलास वळवी, शरद गावित, पराग कोकणी, किरण कोकणी, आशिष रेवा, प्रणित चोधरी, सलावी पवार, सुशिल कोकणी, जयेश कोकणी, मयुर पवार, रजनिकांत कोकणी, रितेश चौरे, कल्पेश गावित, सानिया चौरे, दक्षिणी चौधरी, पूनम राऊत, मितल राऊत, वर्षा वळवी, सुहास चौरे, आर्यन गांगुर्डे आदींनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...