आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण अपघात:तोरणमाळ घाटात जीप दरीत कोसळली; सहा मजुरांचा जागीच मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धडगाव तालुक्यातील सातपुड्यातील दुर्गम भागातील तोरणमाळ घाटातील खडकी रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारी जीप 70 फुट खोल दरीत कोसळली आहे.यात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जीपमध्ये 31 प्रवासी होते अशी माहिती आहे.

महाराष्ट्र -मध्यप्रदेश राज्यातील सीमावर्ती भागातील खडकी गावातून तोरणमाळ येथे कामाला जात असताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे.

प्रत्यक्षादर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार मजुर घेऊन जाणारी जीप 70-80 दरीत कोसळल्याने मजुरांचे प्रेत झाडात दगडावर जोरदार आदळल्याने मृत्यू झाला. यात लहान मुलीचा देखील समावेश आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे. जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.प्रवाशी जीप खोल दरीत कोसळल्याने प्रवाश्यांचा शोध सुरू आहे.

अपघात एवढा भीषण आहे की, जीपचे सर्व भाग दरीत अस्तावस्त पडलेले आहेत.
अपघात एवढा भीषण आहे की, जीपचे सर्व भाग दरीत अस्तावस्त पडलेले आहेत.

अपघात इतका भीषण झाला आहे की प्रवाशी जीपचे सर्व भाग दरीत अस्ताव्यस्त पडलेले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हसावद पोलीस घटनास्थळी दाखल झाले.आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी मदत करीत आहे. दरीतून मजुरांचे प्रेत काढण्यासाठी अवघड जात आहे. जखमींना मिळेल त्या साधनाने रूग्णालयात नेण्यात येत आहे.

तोरणमाळ घाटाचा फाइल फोटो
तोरणमाळ घाटाचा फाइल फोटो
बातम्या आणखी आहेत...