आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबार:तळोदा बोरद रस्त्यावर दोन दुचाकींची धडक, 10 वर्षीय बालकासह पाच जणांचा जागीच मृत्यू

नंदुरबारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपघातात एका आई आणि लेकाचा तर एका बाप-लेकाचा मृत्यू

तळोदा तालुक्यातील तळवे रोडवर बुधवारी चार वाजताच्या सुमारास दुचाकीची समोरा-समोर धडक झाली. यामध्ये तुळाजा येथील 3 व तळोदा येथील 2 असे एकूण 5 जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.

तळोदा तालुक्यातील आमलाड ते बोरद रस्त्यावर दुपारी 4 च्या सुमारास समोरासमोरून येणाऱ्या दोन मोटरसायकली एकमेकांना धडकल्या. मुलाचे आधार कार्ड अपडेटसाठी तळोदा येथे आलेले कुटुंब आपले कामे आटोपून तुळाजाकडे जात असताना हा अपघात घडला. दरम्यान या अपघातात दारासिंग छगन जाभोरे (48), मदन दिवळ्या नाईक (50), अमित मदन नाईक (10) हे जागीच ठार झाले.

बोरद येथून शेतीचा मोजनीचे कामे आटूपुन उमेश शांतीलाल चव्हाण दुचाकीने आई व पत्नी सोबत तळोदा येथे परतत होते. अपघातात त् उमेश शांतीलाल चव्हाण व सोबत असलेली त्याची आई सुनंदा चव्हाण यांना गंभीर मार लागला. पूजा उमेश चव्हाण यांना मुक्का मार लागला. यांना उपचारासाठी तातळीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान उमेश शांतीलाल चव्हाण (30) आणि सुनंदा चव्हाण या मायलेकाचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...