आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला शेतकऱ्याचा मृत्यू:नंदुरबारच्या महिला शेतकऱ्याचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनात मृत्यू, 16 जानेवारीपासून राजधानीत ठाण मांडून होत्या सीताबाई

नंदुरबार2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीताबाई अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथील लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्या होत्या

कृषी कायद्याविरोधात मागील 2 महिन्यांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या दरम्यान एकीकडे प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारामुळे आरोप प्रत्यारोप होत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी बातमी आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार शेतकऱ्यांच्या आंदोलनात महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील महिला शेतकऱ्याचा थंडीच्या कडाक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सीताबाई रामदास तडवी (वय 56 वर्षे) असे या महिेलेचे नाव असून ती अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथील लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्या होत्या.

लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते गेले होते. तडवी यादेखील त्यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. सीताबाई या 16 जानेवारीपासून शहाजहापूर येथे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या, यादरम्यान सीताबाई तडवी यांची प्रकृती खालावली, सकाळी उठून त्यांनी दात घासले आणि बरे वाटत नसल्याने त्या पुन्हा झोपी गेल्या आणि झोपेतच थंडीच्या कडाक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आंदोलकांकडून देण्यात आली आहे. त्यांचे शव अंबाबारी येथे आणण्यात येत आहे.

सीताबाई तडवी यांचे घर
सीताबाई तडवी यांचे घर
बातम्या आणखी आहेत...