आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरचीचे गालिचे...:फोडणीसाठी प्रसिद्ध नंदुरबारच्या मिरचीचे अंथरले गालिचे...

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबारची लाल मिरची फोडणीसाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. येथून मोठ्या प्रमाणात मिरचीची निर्यात देशभरात होते. मिरचीच्या आवकमध्ये देशात गुंटूरनंतर नंदुरबारचा क्रमांक लागतो. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ३५ हजार क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. येथील बाजार समितीत मिरची वाळवण्यासाठी पथारींवर मिरचीचे गालिचे अंथरले जात आहेत. त्यामुळे मजुरांना राेजगारही उपलब्ध झाला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमी | ^बेमोसमी पाऊस, रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा आवक कमी आहे. ओल्या मिरचीला ५ ते ९ हजार भाव आहे. गेल्या वर्षी २ लाखांच्या पुढे आवक झाली होती. जरीला, व्हीएनआर, फापडासह २० प्रकारची मिरची या ठिकाणी उपलब्ध आहे. - योगेश अमृतकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती

बातम्या आणखी आहेत...