आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या मान्यतेने नुकतीच साउथ मुंबई ज्युनियर चेस चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. यात संपूर्ण राज्यातील बाल गटातील खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना अश्वमेघराज चेस क्लबच्या खेळाडूू नारायणी उमेश मराठे व भूमी जितेंद्र धगधगे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सात वर्षाखालील गटात बेस्ट अंडर ७ व बेस्ट अंडर ६ चे पारितोषिक पटकावले.
जिल्ह्याचा नावलाैकीक
नारायणी हिने या वर्षी अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. तर गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या ७ वर्षाखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांकाने यश प्राप्त केले. अशी कामगिरी करणारी बाल गटातील ती पहिलीच खेळाडू ठरली. तर भूमी हिने या वर्षी नागपूर येथील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. तर गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या ७ वर्षाखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत देखील ‘बेस्ट प्लेअर’चे पारितोषिक पटकावले.
या दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत जिल्ह्याचा नावलौकिक केला. खेळाडूंना अश्वमेघराज चेस क्लबचे राष्ट्रीय प्रशिक्षक शोभराज खोंडे, मेघा खोंडे, अश्वमेघराज खोंडे, सागर महाजन, विनीत बागुल यांचे मार्गदर्शन लाभत असून दाेन्ही खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन हाेत आहे. एवढ्या लहान वयात या दाेन्ही खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचा सर्वांना अभिमान वाटत असून त्यांचे काैतुक हाेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.