आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस क्रीडा स्पर्धा:नाशिक शहर संघाला सर्वसाधारण जेतेपद

नंदुरबार22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

३३ व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुष व महिला अशा दोन्ही गटांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या नाशिक शहर पोलिस दलास नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते सर्वसाधारण विजेतेपद देण्यात आले. तसेच सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानावर असलेल्या खेळाडूंना व संघांना नाशिक शहराचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्रक देवून गौरव करण्यात आला.

येथील कवायत मैदानावर खेळल्या गेलेल्या या क्रीडा स्पर्धेचा समाराेप शुक्रवारी दुपारी वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा पोलिस दलाच्या कवायत मैदानावर झाला. क्रीडा स्पर्धेमध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, नाशिक ग्रामीण व नाशिक शहर अशा सहा संघांच्या एकूण ७७६ सांघिक व वैयक्तिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. दरम्यान या क्रीडा स्पर्धांमुळे पाेलिस दलामध्ये सर्वत्र उत्साहाचे तसेच चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

दाेन्ही सर्वाेत्कृष्ट अॅथलिट्स नंदुरबारचे
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार भूषण चित्ते व निंबाबाई वाघमोडे यांनी सदर क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करत सर्वोत्कृष्ट पुरुष व महिला अॅथलिट्सच्या पुरस्कारावर आपले नावे कोरली.

बातम्या आणखी आहेत...