आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकअदालतीचे आयाेजन:राष्ट्रीय लोकअदालतीचे 12 नोव्हेंबर रोजी नंदुरबारला आयोजन

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, नंदुरबार व तालुकास्तरावर शनिवार १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयाेजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्व प्रकारचे दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात दावे, कौटुंबिक हिंसाचार, चलनक्षम दस्तऐवज प्रकरणे, किरकोळ स्वरुपाची दिवाणी प्रकरणे, भूसंपादनाशी संबंधित असणारी प्रलंबित प्रकरणे या अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहे, असे कळवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...