आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:नवापूर पोलिसांनी पकडला 1 लाख 85 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा

नवापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील भाजीपाला मार्केट जवळील करंजी ओवारा पुलावर अवैधरीत्या दारू घेऊन जात असलेल्या गाडीला नवापूर पोलिसांनी पकडून १ लाख ५ हजार ४२० रुपयांचा अवैध मद्यसाठा मंगळवारी दुपारी पोलिसांनी पकडला. तसेच ८० हजारांची कारही जप्त केली.

या कारवाईत १ लाख ८५ हजार असा मुद्देमाल नवापूर पोलिसांनी जप्त केला आहे. मारुती सुझुकी कार (जीजे १९, ए १४९१) मध्ये देशी विदेशी टॅंगो, इंपिरियल ब्लू, किंगफिशर बियर, रॉयल स्टॅग विस्कीचा समावेश आहे. याप्रकरणी गणेश शिंगा गावित (वय २७, रा. लक्कडकोट ता. नवापूर) व सलमान विजय वळवी (वय ३२, रा. खोकारवाडा, ता. नवापूर) यांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ यांनी दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...