आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:संचारबंदीत मुक्तसंचार करणार्‍यांना पोलिसांचा "दंडूकासन", 15 मोटरसायकल केल्या जप्त

नवापूर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • नवापूर शहरातील लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठिताना 200 रुपयांचा दंड

नवापूर शहरातील रंगेश्वर पार्क मधील व्यायामाच्या बहाण्याने सकाळ-सायंकाळी फिरण्यासाठी मोठी गर्दी होते. लोकांनी रस्ते गच्च भरले होते कोठेही सुरक्षित अंतर नाही, मास्क नाही. असे सगळे चिंताजनक वातावरण सर्वत्र आहे. शासकीय सर्व यंत्रणा नागरिकांच्या काळजीसाठी अहोरात्र झटत असताना नागरिक बेफिकीर आहेत, नवापूर शहरातील लोकप्रिनिधी व प्रतिष्ठित नागरिक गंभीर आजाराबाबत गंभीर दिसत नाही. या संदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या टिमने रंगेश्वर पार्क मध्ये जाऊन इविनिंगवाक करणाऱ्यांची परड घेतली. 15 मोटरसायकली जप्त करून 200 रूपये प्रमाणे दंड करून शिकवला नवा योगा "दंडूकासन". काहींनी यादरम्यान दिसेल त्याठिकाणी पळ काढला.

लॉकडाउन आणि संचारबंदीचा आदेश, शेजारी दोन्ही जिल्ह्यात कोरोनाची लागण तरी देखील गंभीर दिसत नाही नागरिक. भाजीमार्कट प्रचंड गर्दी, किराणा दुकानांसमोर लांबलचक रांगा, चौकाचौकातील बाकांवर लोक आरामात गप्पा मारत बसलेले असतात. सकाळी सिनियर कॉलेज जवळ, रंगेश्वर पार्क, पंचमुखी हनुमान मंदीर, जुन्या आरटीओ नाका, लालबारी, लहान चिंचपाडा, कंरजी ओवरा परिसरात सकाळ संध्याकाळ लाॅकडाऊन मध्ये फिरताना दिसतात. यात सर्व क्षेत्रातील नागरिकांचा समावेश आहे. कोरोना संदर्भात कधी जागृती निर्माण होईल हा मोठा प्रश्न आहे.

बातम्या आणखी आहेत...