आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:राष्ट्रवादीने केले छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या पुतळ्याचे शुद्धीकरण‎

तळोदा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ‎ ‎ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‎वक्तव्याला पाठींबा देत छत्रपती ‎शिवरायांचा अवमान करणाऱ्या ‎ ‎ भाजपच्या नेत्यांचा निषेध केला.‎ तसेच छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या पुतळ्याचे शुद्धीकरण‎ करून आंदोलन केले.‎ राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष‎ उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली‎ आंदोलन करण्यात आले. सतीश‎ जोशी, सोहम जोशी, अथर्व टोपले‎ या पुरोहितांच्या हस्ते पूजा अर्चना व‎ दुग्ध अभिषेक करून प्रतिमा पवित्र‎ करण्यात आली.

या वेळी उत्तर‎ महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्षा‎ अनिता संदीप परदेशी, तालुका‎ अध्यक्ष पुंडलिक राजपूत,‎ शहराध्यक्ष योगेश मराठे, जिल्हा‎ उपाध्यक्ष रामराव आघाडे,‎ केसरसिंग क्षत्रिय, माजी बांधकाम‎ सभापती हितेंद्र क्षत्रिय, युवा नेतृत्व‎ संदीप परदेशी, शहादा तळोदा‎ विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी,‎ सरपंच सविता राजपूत, शोभा‎ क्षत्रिय, मोनाली पाडवी, सुनंदा‎ पाडवी, गायत्री खाटीक, युवक‎ तालुका अध्यक्ष कमलेश पाडवी,‎ कृ.उ.बा.स.मा.संचालक प्रल्हाद‎ फोके, अल्पसंख्यांक तालुका‎ अध्यक्ष आरीफ शेख नुरा, जिल्हा‎ सरचिटणीस अ.स.से.याकूब,‎ सरचिटणीस महेंद्र पोटे, संघटक‎ राहुल पाडवी, शहर उपाध्यक्ष नदीम‎ बागवान, गणेश राणे, अनिल पवार,‎ गणेश पाडवी आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...