आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजनेचा बोजवारा:शहादा तालुक्यात हगणदारीमुक्तीकडे दुर्लक्ष; उघड्यावर जाणे अद्यापही सुरूच

शहादा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शासनाचा निधी देऊन प्रयत्न; नागरिकांकडून उदासिनता

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत व विविध शासकीय योजनांद्वारे ग्रामीण भागातील कुटुंबांना शौचालये देण्यात आली. शहादा तालुक्यात परंतु त्यांचा वापर करण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये हागणदारी मुक्ती केवळ देखावा ठरली असून त्याचे तीनतेरा वाजले आहे. शासकीय तिजोरीतून निधी देऊन ग्रामीण भागात गावे हागणदारीमुक्त करण्याचा शासनाने प्रयत्न केला असला, तरी तो केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे.

अनेक गावांमध्ये शौचालय एक त्याचे फोटो शासन दरबारी अनेक अशी ग्रामपंचायत स्तरावरील सत्य परिस्थिती आहे. त्यात लाभार्थी, अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार व सगळ्यांची सांगड घालून देणारे विविध स्तरावरील दलाल सामील आहेत. शासनाने ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन राबवून ग्रामीण जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी गावे हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यासाठी शासनाने स्वतः ग्रामीण कुटुंबीयांना घर तेथे शौचालय संकल्पना राबवून स्वखर्चाने शौचालये बांधून दिली. त्यासाठी अनेक अटी व नियम लावण्यात आले. गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर हे मिशन आता मागे पडले आहे. शहादा तालुक्यातील हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या लोकांचा अपवाद वगळला तर गावात प्रवेश करताच दुर्गंधीने स्वागत होते.

बातम्या आणखी आहेत...