आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शहाळ्यांपासून चिमण्यांसाठी साकारली घरटी; लोणखेडा महाविद्यालयाच्या 80 विद्यार्थ्यांनी राबवला विधायक उपक्रम

शहादा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणखेडा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ८० विद्यार्थ्यांनी ओल्या नारळांपासून चिमण्यांच्या संवर्धनासाठी विशेष उपक्रम हाती घेतला असून, महाविद्यालयाच्या परिसरातील वृक्षांच्या फांद्यांना नारळाच्या करवंटीपासून घरटे तयार करून टांगण्यात आले आहे. यामुळे चिमणी संवर्धनास मोठा फायदा होणार आहे.

सध्या अतिशय तीव्र उन्हाळा सुरू असल्याने झाडांवरती पक्ष्यांची किलबिल थांबली आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पक्षी लपण्यासाठी जागा शोधायला लागले आहेत. ४६ अंशांपर्यंत तापमान गेल्याने पक्ष्यांची पिल्ले मृत्युमुखी पडत आहेत. म्हणून लोणखेडा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना ओल्या नारळाच्या करवंटीपासून घरटे तयार केली आहे. यासाठी प्रा. राजेंद्र पाटील, प्रा. डॉ. वर्षा चौधरी, प्रा. वजीह अशहर यांनी मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले. सुमारे ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ५० घरटे बनवले आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः झाडांवर चढून फांद्यांना नारळाच्या करवंटीपासून बनवलेले घरटे बांधले. सध्या वाढलेली उष्णता बघता चिमण्यांना वाचवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी घरटे बनवणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांनी राबवलेल्या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, समन्वयक मकरंद पाटील यांनी कौतुक केले.

शहाळे थंड असल्यामुळे चिमण्यांना मिळेल गारवा
ओल्या नारळाच्या करवंटीला गोलाकार कापून चिमणी प्रवेश करू शकेल एवढी जागा ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे नारळ हे थंड असल्याने चिमण्यांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी मदत होईल. चिमण्यांच्या घरट्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच पाण्याच्या बाटल्यांना छिद्रे पाडून पाण्याची व्यवस्था केली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...